Cloudburst Situation | Kolhapur मध्ये जोरदार पावसामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप - tv9

Cloudburst Situation | Kolhapur मध्ये जोरदार पावसामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप – tv9

| Updated on: Aug 28, 2022 | 9:52 AM

चंदगडमधील कुदुर गावात आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे येथील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आलेले आहे. तर गुडघाभर पाण्यातून वाढ काढताना शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात पावसाने उसंत दिली आहे. त्यामुळे गणराजाच्या आगमनात अबालवद्ध गुंतले होते. त्यातच आता गणेशोत्सवाला आता काहीच दिवस उरले असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. फक्त पावसाने हजेरी लावली नाही तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे पहायला मिळत आहे. चंदगडमधील कुदुर गावात आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे येथील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आलेले आहे. तर गुडघाभर पाण्यातून वाढ काढताना शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तर अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.

Published on: Aug 28, 2022 09:52 AM