Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाला मोठा धक्का

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाला मोठा धक्का

| Updated on: Mar 29, 2023 | 4:26 PM

Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory Election : सतेज पाटील यांना मोठा धक्का; छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठी घडामोड; पाहा व्हीडिओ...

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज छाणणीत अवैद्य ठरले आहेत. कारखान्याला नियमित नियमानुसार ऊस न घातल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय सतेज पाटील यांनी घेतला आहे. निवडणूक बिनविरोध होणार नाही. आम्ही न्यायलयीन लढाई लढू.आजचा दिवस काळा आहे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी तब्बल 236 अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी 135 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक गटात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आमचं ठरलंय आता कंडका पाडायचा…, असं म्हणत सतेज पाटील यांनी महाडिकांना आव्हान दिलंय.

Published on: Mar 29, 2023 04:26 PM