कोल्हापुरचा वैभव रंकाळा पडला कोरडा; कधी पाण्याने तुडुंब भरलेला रंकाळ्यावर आता सेल्फीसाठी नागरिकांची गर्दी
याला आजपर्यंत भरलेलाच अनेकांनी पाहिला आहे. मात्र आता नेहमीच पाण्याने तुडुंब भरलेला रंकाळा सध्या कोरडा पडत झालेला आहे. कडक उन्हाळा आणि त्यानंतर पावसानं दिलेल्या दडीमुळे रंकाळ्यातील पाणी आटू लागले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचं वैभव, मरीन ड्राइव्ह अशी ओळख रंकाळा तलावाची आहे. याला आजपर्यंत भरलेलाच अनेकांनी पाहिला आहे. मात्र आता नेहमीच पाण्याने तुडुंब भरलेला रंकाळा सध्या कोरडा पडत झालेला आहे. कडक उन्हाळा आणि त्यानंतर पावसानं दिलेल्या दडीमुळे रंकाळ्यातील पाणी आटू लागले आहे. सध्या तलावातील पाणीपातळी निम्म्याहून कमी झाली असून यातील पाणी आटत आहे. सर्वत्र उन्हाचा कहर सुरू असून याची झळ आता रंकाळा तलावालाही बसली आहे. पाण्याने तुडुंब भरलेला रंकाळा सध्या कोरडा पडत चालला आहे. तलावातील पाणी कमी झाल्याने नागरिक तलावाच्या मध्यभागी जाऊन सेल्फी काढण्याचा आनंद लुटतायत.
Published on: Jun 19, 2023 03:05 PM
Latest Videos