Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
Kolhapur News : कोल्हापूर न्यायालयाने प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सध्या कोरटकर हा न्यायालयीन कोठडीत आहे.
कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरला झटका दिलेला आहे. प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कोरटकर याने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देखील दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कोरटकर याला अटक केली आहे. 3 दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर कोरटकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. त्यानंतर कोरटकर याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान कोर्टाने कोरटकरचा अर्ज फेटाळला आहे.
Published on: Apr 01, 2025 06:54 PM