आधी छापे आता ईडीकडून चौकशी; हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

आधी छापे आता ईडीकडून चौकशी; हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

| Updated on: Feb 18, 2023 | 9:20 AM

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन माजी संचालकांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाहा...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तीन माजी संचालकांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. सर्जेराव पाटील पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे यांची चौकशी करण्यात आली आहे. ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणी ही चौकशी झाली आहे. चौकशीनंतर या तिघांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. ब्रिक्स प्रकरणी सर्वच माजी संचालकांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. बँकेवरील छापा सत्रानंतर तर आता माजी संचालकांची चौकशी झालीय. त्यामुळे राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Published on: Feb 18, 2023 09:20 AM