हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर कागल पेटलं…
कार्यकर्त्यांचे जथ्थे हसन मुश्रीफ यांच्या घराकडे रवाना झालेत. कागलमध्ये फक्त हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांचाच आव्वाज पाहायला मिळतोय.
Kolhapur Kagal Bandh : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरु आहे. अशात मुश्रीफ यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुश्रीफ समर्थक रस्त्यावर उतरलेत. मुश्रीफसाहेब तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा घोषणा दिल्या जात आहेत. ईडीकडून केली जाणारी कारवाई बेकायदेशीर आहे, असं म्हणत हजारो कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या घराकडे रवाना झालेत. कागल बंदची हाक या कार्यकर्त्यांनी दिली आहे. जिल्हा बंदची हाक देण्याची तयारीही या कार्यकर्त्यांनी दाखवलीय.
Published on: Jan 11, 2023 10:56 AM
Latest Videos