कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 5 एप्रिल पासून सुरू होणार; ‘या’ एअरवेजच्या माध्यमातून दिली जाणार सेवा
Kolhapur Mumbai Airlines : कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 5 एप्रिल पासून सुरू होणार आहे. आठवड्यातून चार दिवस ही विमानसेवा सुरू होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा 5 एप्रिल पासून सुरू होणार आहे. आठवड्यातून चार दिवस ही विमानसेवा सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी करता येणार कोल्हापूर-मुंबई असा विमानप्रवास करा येणार आहे. स्टार एअरवेजच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे. याआधी आठवड्यातून दोन वेळा कोल्हापूर-मुंबई सेवा दिली जात होती. मात्र वेळ सोईस्कर नसल्याने प्रतिसाद मिळत नव्हता. आता पुन्हा एकदा ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. स्टार एअरवेजच्या विमानाचं सकाळी साडेदहा वाजता मुंबईतून टेकऑफ होणार आहे. तर कोल्हापूरहून मुंबईसाठी सकाळी 11.55 वाजता टेक ऑफ होणार आहे. तर हे विमान मुंबईत 12 वाजून 55 मिनिटांनी लॅन्ड होणार आहे.
Published on: Mar 26, 2023 10:13 AM
Latest Videos