छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल समोर; कोण आघाडीवर?
Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory Election : माजी आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस; पहिल्या कलात कोण आघाडीवर? पाहा व्हीडिओ...
कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवार प्रतिनिधींसमोर मतपेट्या फोडण्यात आल्या. 29 टेबलवर दोन फेऱ्यात मतमोजणी होत आहे. छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील गटात प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. उत्पादक गट क्रमांक 1 मध्ये सत्ताधारी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत सत्ताधारी छत्रपती राजर्षी शाहू सहकारी आघाडी उत्पादक गट क्रं 1 मध्ये आघाडीवर आहे. गट क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर मतदानाचा आकडा समोर आला आहे. महाडिक पॅनेलमधील विजय वसंत भोसले यांना 3244 मतं तर संजय बाळगोंडा मगदूम यांना 3169 मतं मिळाली आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या गटातील शालन बाबुराव बेनाडे यांना 2441 मतं मिळाली आहेत. तर किरण बाबासो भोसले यांना 2413 मतं मिळाली आहेत.