राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बाळासाहेबांची जादू नाहीशी करायचीय; शिवसेनेच्या मंत्र्याचा आरोप

राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बाळासाहेबांची जादू नाहीशी करायचीय; शिवसेनेच्या मंत्र्याचा आरोप

| Updated on: Apr 05, 2023 | 1:29 PM

Deepak Kesarkar on Mahavikas Aghadi : मंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही त्यांनी संदर्भ दिला आहे. पाहा...

कोल्हापूर : मंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. जादू ही नेहमी बाळासाहेब ठाकरे यांची असते. बाळासाहेब यांच्या जादूपासून दूर गेलं की काय होतं? याचा अनेकांना अनुभव आहे. कालचा जो मेळावा झाला त्याच्या जाहिरातीवरून बाळासाहेब यांचे नाव गायब होतं. हे त्यांची छापलं होतं ते काय आम्ही छापलं होतं? राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न राहिला आहे की बाळासाहेब यांची जादू नाहीशी करायची. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण शिंदे साहेब यांनी उठाव केला आणि बाळासाहेब यांचं नाव कायम ठेवलं, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

Published on: Apr 05, 2023 01:29 PM