अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली, देवेंद्र फडणवीसच स्क्रिप्ट रायटर

“अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली, देवेंद्र फडणवीसच स्क्रिप्ट रायटर”

| Updated on: Apr 19, 2023 | 2:06 PM

Sushma Andhare on Ajit Pawar : शिवसेनाच्या महिला नेत्याचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात; म्हणाल्या...

कोल्हापूर : अजित पवार भाजपच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय.  अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे. वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसदानंतर भाजपकडून हे केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मौन सगळंकाही सांगून जात आहे. स्क्रिप्ट रायटर हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. पुलवामा आणि इतर विषयावर प्रश्न विचारणे थांबणार नाही. मुद्दे डायव्हर्ट करणारे बालिश खेळ भाजपने बंद करावेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अजित पवार यांनी काल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत. त्यांची घडामोडींवरची स्टेटमेंट पाहता, शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात. महाविकास आघाडी अभेद्य आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत.

Published on: Apr 19, 2023 02:05 PM