Kolhapur : पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Kolhapur : पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Jul 15, 2022 | 9:54 AM

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) मुसळधार पाऊस सुरू असून, पावसामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने या नदीवर असणारे बंधारे देखील भरले आहेत. नदीला पूर आल्याने पुराचे पाणी नदी काठच्या शेतात घुसले. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला असून, पिके पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.