‘चोरमंडळ’ शब्दावर आक्षेप घेत विरोधकांची टीका, संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
चाळीस चोरांचा अलिबाबा म्हणजे शिवसेना नव्हे. कोल्हापुरातही साडेतीन चोर आहेत. त्यांना आपण कायमची श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे उभे आहोत, असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
कोल्हापूर : माझ्या शब्दावर आक्षेप घेण्यापेक्षा माझ्या भावना समजून घ्या. ते आमदार असतील, तर मीही खासदार आहे. विधिमंडळाचं महत्व मी जाणून आहे, असं संजय राऊत म्हणालेत.’चोरमंडळ’ शब्दावर आक्षेप घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय शिवगर्जना अभियानांतर्गत गडहिंग्लजमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. यात बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका केली. माझ्यासमोर बसलेत ते खरे वाघ आहेत. खऱ्या वाघांशी लढणं भाजपनं गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांना जमणार नाही. वाघाचं कातडं पांघरून वावरणारे निघून गेले. शिवसेना चोरली म्हणत आहेत.मग हे माझ्या समोर बसलेले कोण आहेत? चाळीस चोर म्हणजे शिवसेना नाही!, असं राऊत म्हणालेत.
Latest Videos