Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं : महाडिक-पाटील वाद शिगेला, बिंदू चौकात वेळ टळली, अन्यथा...

कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं : महाडिक-पाटील वाद शिगेला, बिंदू चौकात वेळ टळली, अन्यथा…

| Updated on: Apr 15, 2023 | 12:07 PM

माजी आमदार अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना बिंदू चौकात खुल्या चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिल्यानंतर आता काय होणार अशी अवस्था पोलिसांची तर कार्यकर्त्यांमध्ये आता कंडक पाडायचंच अशी झाली होती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीवरुन आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि महाडिक गट हे एकमेकांच्या समोर आले आहेत. कारखान्याच्या निवडणुकीवरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता थेट लोकांच्या समोरच डागण्यात येत आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना बिंदू चौकात खुल्या चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिल्यानंतर आता काय होणार अशी अवस्था पोलिसांची तर कार्यकर्त्यांमध्ये आता कंडक पाडायचंच अशी झाली होती. यादरम्यान साडेसात पावणे आठच्या सुमारास माजी आमदार अमल महाडीक हे बिंदू चौकात दाखल झाले. त्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करत सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. साडेसात वाजले आहेत. मी त्यांची वाट बघतोय. आज आम्ही घाबरलेलो नाही ते आम्हाला भ्याले आहेत. त्यावर त्यांची समजूत काढत पोलिसांनी महाडिक यांना पाठवून दिले. यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी करेक्ट सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान आपण दसरा चौकात आलो होतो. मात्र महाडिक यांनीच सत्तेचा गैरवापर करत पोलिसांमार्फत आम्हाला तेथे थांबवल्याचा घणाघात केला.

 

Published on: Apr 15, 2023 10:36 AM