दैव बलवत्तर म्हणून...वारणा नदी पात्रात अडकला होता पठ्ठा; NDRFच्या मदतीने बचावला!

दैव बलवत्तर म्हणून…वारणा नदी पात्रात अडकला होता पठ्ठा; NDRFच्या मदतीने बचावला!

| Updated on: Jul 28, 2023 | 1:19 PM

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात थोडी उसंत घेतल्याने दिलासा मिळालाय. परंतु, घाट माथ्यावर आणि धरण परिसरात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान वारणा नदीच्या अडकलेल्या एका व्यक्तीची कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थपनाच्या पथकाने सुखरुप सुटका केली आहे.

कोल्हापूर, 28 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात थोडी उसंत घेतल्याने दिलासा मिळालाय. परंतु, घाट माथ्यावर आणि धरण परिसरात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान वारणा नदीच्या अडकलेल्या एका व्यक्तीची कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थपनाच्या पथकाने सुखरुप सुटका केली आहे. हा इसम जवळपास 12 ते 13 तास झाडावर अडकून होता. जयवंत खामकर असं या इसमाचं नाव आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने या इसमाने वारणा नदीत उडी मारल्याची प्राथमिक माहिती होती. परंतु तोल गेल्याने पाण्यात पडल्याचं जयवंत खामकर यांनी बाहेर आल्यानंतर सांगितलं.

Published on: Jul 28, 2023 01:19 PM