संजय राऊतांनी बाप काढताच राणे खवळले, दिला इशारा, म्हणाले, दाखवाच

संजय राऊतांनी बाप काढताच राणे खवळले, दिला इशारा, म्हणाले, दाखवाच

| Updated on: Apr 30, 2023 | 7:05 AM

त्यांनी ठाकरे यांना तारिख सांगा आम्ही तयार आहोत. कोकणातून मुंबईत जायला किती किलोमीटर पळावं लागेल हे बघा. तर चालायची ताकद नसणाऱ्यांनी पळायची भाषा करू नये असा घणाघात केला आहे.

मुंबई : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू गावात रिफायनरी प्रकल्प (Barsu Refinery Project) होत आहे. मात्र या प्रकल्पाला तेथील ग्रामस्थांचा विरोध होताना दिसत आहे. मात्र येथील प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध नसून फक्त मतासाठी राजकारण केले जात असल्याची टीका शिंदे गटाकडून ठाकरे गटावर होताना दिसत आहे. रिफायनरीला विरोध केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि ठाकरे गट पेटून उठला. एका इस्लामिक कंपनीसाठी हिंदू सरकारचं हे काम म्हणत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सरकारवर हल्ला चढवला. तसेच आपण आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच बारसूला जाणार असल्याचे सांगितलं. त्यावरून माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे यांना तारिख सांगा आम्ही तयार आहोत. कोकणातून मुंबईत जायला किती किलोमीटर पळावं लागेल हे बघा. तर चालायची ताकद नसणाऱ्यांनी पळायची भाषा करू नये असा घणाघात केला आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेचे दोन वाघ आणि दोन माजी मुख्यमंत्री एकमेकांसमोर आले आहेत. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 30, 2023 07:05 AM