कृष्णा नदी प्रदुषणाविरोधात सांगलीकरांचा एकसंघतेचा हुंकार
दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला
सांगली : काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ लाखो मासे हे प्रदूषणामुळे मृत झाले होते. त्यानंतर दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला. दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर आता कृष्णा नदी प्रदुषणाविरोधात सांगलीकरांचा एकसंघतेचा हुंकार पहायला मिळत आहे.
कृष्णा नदीत होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध सांगली शहरातील नागरिक जागृती मंचच्या वतीने मानवी साखळी करत आंदोलन केलं. आयर्विन पुलापासून ते महापालिकेच्या दारापर्यत या मानवी साखळी ने आंदोलन होणार आहे. याआंदोलनात सामान्य नागरीक, व्यापारी, फेरीवाले, रिक्षावाले, हमाल, विद्यार्थी, महिलांसह सर्व घटक सहभागी झाले आहेत.
Latest Videos