मासे मृत्यूप्रकरण दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती शुगर्सला भोवलं; करण्यात आली ‘ही’ कारवाई
कृष्णा नदीचे प्रदूषण आणि लाखो माशांच्या मृत्यूप्रकरणी दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे
सांगली : काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीत अंकलीजवळ लाखो मासे हे प्रदूषणामुळे मृत झाले होते. त्यानंतर दत्त इंडिया, स्वप्नपूर्ती शुगर्सला नोटीस बजावली होती. पण आता प्रत्यक्षात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कृष्णा नदीचे प्रदूषण आणि लाखो माशांच्या मृत्यूप्रकरणी दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाटबंधारे आणि महावितरण कंपनीने ही कारवाई केली. याप्रकरणी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ अवताडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला पाठवला होता.
त्यानुसार पाटबंधारे विभागाला पाणीपुरवठा तोडण्याचे आणि महावितरण कंपनीला वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र कारवाई करण्यात आली नव्हती. पण आता दत्त इंडिया कंपनीसह डिस्टिलरी चालविणाऱ्या स्वप्नपूर्ती शुगर्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करत कारवाई करण्यात आली आहे.