“मतदार संघातील कामांसाठी 50 कोटांचा निधी द्या”, आमदारांनंतर अजित पवार खासदारांना निधी देणार?
मतदारसंघातील विकास कामांसाठी शिवसेनेच्या खासदाराने अजित पवार यांच्याकडे 50 कोटी निधीची मागणी केली आहे. त्यामुळे आता अजित पवार आमदारांप्रमाणे खासदारांनाही निधी देणार का? याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
नागपूर, 25 जुलै 2023 | अजित पवार यांनी अर्थखात्याची जबाबदारी स्वीकारताच आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे. आमदारांच्या विकास कामांसाठी अजित पवार यांनी निधीचा वर्षाव केला आहे. दरम्यान आमदारांना निधी मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या खासदारानने मतदारसंघातील विकास कामांसाठी अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. कृपाल तुमाने यांनी सांगितलं की, “लोकसभा निवडणूकीला आठ महिने राहिले, विकास कामांसाठी 50 कोटींच्या निधीची विनंती केली आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 25 कोटी दिले, ही इतिहासातील पहिली घटना आहे. या वर्षीही 50 कोटींच्या निधी द्यावा.” त्यामुळे आता महायुतीच्या आमदारांप्रमाणे अर्थमंत्री अजितदादा खासदारांचा निधी देणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
Published on: Jul 25, 2023 10:44 AM
Latest Videos