Kunal Kamra Updates : कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
Kunal Kamra Controversy : कॉमेडीयन कुणाल कामराचे CDR रेकॉर्डिंग तपासले जाणार आहेत. याबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत माहिती दिली आहे.
कॉमेडीयन कुणाल कामराच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. कुणाल कामरा याचे सर्व CDR आता तपासले जाणार आहेत. CDR सोबत कॉल रेकॉर्डिंग आणि बँक खात्याची देखील चौकशी केली जाणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती आज विधानपरिषद सभागृहात दिली आहे.
कुणाल कामरा याने शिंदेसेनेवर वादग्रस्त गाणं तयार केलं आहे. ते गाणं काल खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून शेअर देखील केलं होतं. त्यानंतर महायुतीचे नेते आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. खार येथे असलेल्या कुणाल कामराच्या स्टुडिओची देखील शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड काल केली. कुणाल कामरा याने हे सर्व शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून केलं असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. त्यानंतर आता कुणाल कामराचे CDR सोबत कॉल रेकॉर्डिंग आणि बँक खात्याची देखील चौकशी केली जाणार आहे. बोलविता धनी कोण हे शोधणार असल्याचं मंत्री योगेश कदम यांनी म्हंटलं आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
