Kurla Accident : ड्रायव्हरला बस चालवण्याचा नव्हता अनुभव, पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातामुळे मुंबईकर हादरले असून या अपघातात आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक व्हिडीओही समोर आले
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातामुळे मुंबईकर हादरले असून या अपघातात आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक व्हिडीओही समोर आले असून त्यामध्ये या अपघाताचा थरार पाहायला मिळत आहे. बसचालक संजय मोरे याला अटक करून त्याच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस तपासातून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे.
कुर्ला पोलिसांनी या बस अपघातासंदर्भात कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती अपघातग्रस्त बस चालवणाऱ्या चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तो कंत्राटी चालक म्हणून 1 डिसेंबरला कामावर रुजू झाला होता. त्याने काल पहिल्यांदाच बेस्ट बस चालवली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ड्रायव्हर संजय मोरे हा फक्त लहान गाड्या चालवायचा, त्याला बससारखी मोठी वाहनं चालवण्याचा अनुभव नव्हता, असे पोलिसांनी सांगितलं. बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता, तसेच चालकाने मद्यपानही केलं नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.