लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ? महायुतीच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ? महायुतीच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

| Updated on: Dec 02, 2024 | 3:47 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून महिलांमध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे. आता या योजनेबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. ही योजना कधीपर्यंत सुरू राहणार याबद्दल महायुती सरकारमधील नेत्याने स्पष्टच सांगितलं आहे.

ही योजना निरंतर सुरू राहणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कर भरणाऱ्या महिलांचा अर्ज अपेक्षित नाही असंही त्यांनी नमूद केलं. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलेने या योजनेसाठी अर्ज केला तर ते अपेक्षत नाहीये. ही योजना तर निरंतर सुरू असणार आहे. पण 2100 रुपये कधीपासून होतील हे सांगण्याचा आज माझा अधिकार नाही.कॅबिनेटची मिटींग होईल, त्यामध्ये यावर चर्चा होईल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

Published on: Dec 02, 2024 03:36 PM