स्वर्गीय गोपीनाथ मुंडे लोकार्पण सोहळा चर्चा मात्र गडकरींची
जवळपास सोळा फूट उंचीचा हा पुतळा असून मुंडेंच्या सार्वजनिक कार्यक्रमाला नितीन गडकरींची पहिल्यांदाच उपस्थिती असणार आहे. त्यामुळे राजकीय चर्चा होताना दिसत आहे.
नाशिक : लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात उंच पुतळ्याचा लोकार्पण होणार आहे. नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे सर्वात मोठ्या स्मारक आणि सर्वात मोठ्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण होणार आहे. यावेळी नितीन गडकरी, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री आणि सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. जवळपास सोळा फूट उंचीचा हा पुतळा असून मुंडेंच्या सार्वजनिक कार्यक्रमाला नितीन गडकरींची पहिल्यांदाच उपस्थिती असणार आहे. त्यामुळे लोकार्पण सोहळा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचा आणि चर्चा मात्र गडकरी यांची होताना दिसत आहे. तर नितीन गडकरी या कार्यक्रमात नेमकं काय बोलतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागणार आहे. तर हे स्मारक एका तळ्यात करण्यात आले असून दोन एकरात आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंढे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. हा संपूर्ण पुतळा 16 फुट उंचीचा आणि ब्रांझचा असून संपूर्ण दोन एकर तळ्याला आकर्षक असे रूप देण्यात आले आहे.