‘टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही...’; सुनील शेट्टीवर कोणी केली टीका

‘टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही…’; सुनील शेट्टीवर कोणी केली टीका

| Updated on: Jul 15, 2023 | 11:58 AM

अभिनेता सुनिल शेट्टी यांने “सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना वाटतं आम्ही सुपरस्टार आहोत, त्यामुळे महागाईचा काही परिणाम होत नाही पण तसं नाही,” असं वक्तव्य केलं होतं.

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्या महाग झाल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. टॉमेटोचे दर तर दीडशेच्यावर गेल्याने टोमॅटोला सोन्याचे भाव आला आहे. तर अनेकांच्या ताटातून आता टोमॅटो दिसेनासा झाला आहे. यावरून अभिनेता सुनिल शेट्टी यांने “सध्या टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे मी टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना वाटतं आम्ही सुपरस्टार आहोत, त्यामुळे महागाईचा काही परिणाम होत नाही पण तसं नाही,” असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यापाठोपाठ आता शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील सुनील शेट्टी याच्यावर खरमरीत टीका केली आहे. यावेळी तुपकर यांनी, टोमॅटोचे भाव वाढल्याने अभिनेता सुनील शेट्टी यांने तो जागतिक विषय केलाय. शेट्टी यांनी टोमॅटोचे भाव वाढल्याने त्यांच्या पत्नीचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. जर भाव वाढले असतील तर सुनील शेट्टी यांनी टोमॅटो खाऊ नये, शेट्टी काही मरणार नाही, मात्र शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करू नये अशा शब्दात तुपकर यांनी अभिनेता सुनील शेट्टीला खडसावलं आहे. याचबरोबर दोन चार वर्षात एखादाच महिना असा येतो की टोमॅटो किंवा कांद्याचे भाव वाढतात. त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात. इतर वेळी भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. मात्र शहरी भागातील लोक हे त्यांचे भांडवल करतात. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते, अशा शब्दात तुपकर यांनी अभिनेता सुनील शेट्टी यांना खडसावले आहे.

Published on: Jul 15, 2023 11:58 AM