अजित पवार यांनी मविआवर बोलणाऱ्या विरोधकांना सुनावलं; शुभेच्छा ही कसल्या दिल्या?
याच्याआधी जागावाटपावरून तर आता पुणे पोटनिवडणुकीवरून मविआत मतभेद समोर येत आहेत. त्याचदरम्यान तिन्ही पक्षांचे मोठा भाऊ छोटा भाऊ यावरूनही वक्तव्य समोर आली आहेत. त्यावरून भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी मविआवर टीका केली होती.
सातारा : महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात सध्या जागावाटपावरून धूसफूस होताना पहायला मिळत आहे. याच्याआधी जागावाटपावरून तर आता पुणे पोटनिवडणुकीवरून मविआत मतभेद समोर येत आहेत. त्याचदरम्यान तिन्ही पक्षांचे मोठा भाऊ छोटा भाऊ यावरूनही वक्तव्य समोर आली आहेत. त्यावरून भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी मविआवर टीका केली होती. तसेच मविआत फूट पडणार असं म्हटलं होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच असं कोण म्हणतयं, तसं जर कोणाला वाटत असेल तर त्यांना स्वप्न पडत असतील. त्यांना ते पाहूद्या. आमच्या त्यांना शुभेच्छा असं म्हटलं आहे.
Published on: May 28, 2023 10:41 AM
Latest Videos