मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच काउंटडाऊन सुरू झालायं; राष्ट्रवादी नेत्याने काय दिले संकेत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच मराठी काउंटडाऊन सुरू झाल्याचे लोकांच्या चर्चेतून ऐकतोय असेही मिटकरी म्हणाले. तर ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात दुर्घटना होतात. त्यावर शिंदे काहीच बोलत नाहीत. आताही कोकणात रिफायनरीवरून आंदोलन सुरू असताना ते स्वतःच्या शेतात गेलेत.
बीड : राज्यात सध्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लागत आहेत. त्यामुळे अनेक चर्चांना उधान येत आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सक्त रजेवर गेल्याच्या अफवा देखील आल्या. त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत अशी कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच काउंटडाऊन सुरू झाल्याचे लोकांच्या चर्चेतून ऐकतोय असेही मिटकरी म्हणाले. तर ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात दुर्घटना होतात. त्यावर शिंदे काहीच बोलत नाहीत. आताही कोकणात रिफायनरीवरून आंदोलन सुरू असताना ते स्वतःच्या शेतात गेलेत. खारघरचा विषय असताना ते त्याच्यावर कुठे बोलले नाहीत याचा अर्थ असा आहे की दिल्लीवरून त्यांना सांगण्यात आले आहे, की आप कुछ बोलो मत. त्यामुळे शिंदे यांचा काउंटडाऊन सुरू झालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याचे राजकारणात कुठे बोलताना दिसत नाहीत. तर खारघर घटनेमुळे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठांमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध नाराजीचा सूर आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल त्यावेळेस हे सरकार कोसळलेलं असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार नाही. तर निकाल लवकर येणार. एवढं मात्र नक्की असे मिटकरी म्हणाले.