बुलढाणा बस अपघातावर अजित पवार संतापले; शासनाला खडेबोल सुनावत म्हणाले, ‘आता तरी गांभीर्यानं…’
हा अपघात बुलडाणा - सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा गावाजवळ झाला. तर आता समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरत खडेबोल सुनावले आहेत.
मुंबई : नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी बसचा समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. ज्यात जोपलेल्या 25 जणांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. तर हा अपघात बुलडाणा – सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा गावाजवळ झाला. तर आता समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरत खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी या अपघाताबद्दल दुखः व्यक्त करताना मृत्यू झालेल्या प्रवाशांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 26 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला असे त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे. तर यावरून राज्य सरकारला तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकारला केल्या आहेत. तसेच समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.