अरे बाबा, तुझे पोट दुखायचं काय कारण? अजित पवार पत्रकारावरच भडकले? अमृता फडणवीस यांच्याशी काय संबंध?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वक्तव्य करताना मजेशीर उत्तर दिले आहे. यावरूनच पत्रकाराने अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी थेट पत्रकारालाच झापणारे शब्द वापरले.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अजित पवारांनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्याने याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटण्यास सुरुवात झाली. त्यावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वक्तव्य करताना मजेशीर उत्तर दिले आहे. यावरूनच पत्रकाराने अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी थेट पत्रकारालाच झापणारे शब्द वापरले. त्यांनी त्या पत्रकाराला, अरे बाबा, तुझे फोटो दुखायचं काय कारण? मला जर कोणी चांगलं म्हणत असतील तर त्यात मला समाधान आहे. तर प्रत्येकाने चांगलं काम करावं. जेणेकरून प्रत्येकाला लोकांनी चांगलं म्हणावं. मी एकटाच नाही दुसऱ्याही क्षेत्रात कोणीही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असले त्यानींही. तर त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यावर मी काय उत्तर द्यावं हे मला तर काही कळलेलं नाही. अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, राजकारणी लोकांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. त्यामुळे कोण कुठं कुठं डोळं मारतंय काहीच सांगता येत नाही असे वक्तव्य केलं होतं.