‘ते जातायत याचा अभिमान आहे, पण मुख्यमंत्री म्हणून गेले असते तर…’; वडेट्टीवार यांनी फडणवीस यांना डिवचलं
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून जापान दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून सध्या राजकीय चर्चा होत आहेत. तर या दौऱ्याने राज्याला काय नवीन मिळणार याची देखील चर्चां रंगली आहे
मुंबई : 20 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2013 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना जापान दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा जापान दौरा पुन्हा आला आहे. मात्र यावेळी या मान आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे. यावेळी जपान सरकारने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे. त्यामुळे सध्या याची जोरदार चर्चा होत आहे. तर यावरून विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आनंद व्यक्त करताना फडणवीस यांना टोला लगावला आहे. वडेट्टीवार यांनी, फडणवीस जपानला जात असल्याचा अभिमान आहे. पण ते मुख्यमंत्री म्हणून गेले असते तर अधिक चांगलं झालं असतं. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मर्यादा आहे. त्यांना मर्यादा कोणी घातल्या सगळ्यांना माहित आहे. उपमुख्यमंत्री म्हणून या दौऱ्यात फार काही त्यांना करता येणार नाही. या दौऱ्यावर फार काही करूही ते शकत नाही. जपान दौऱ्यावर जाण्याचा सन्मान मिळाल्याचा महाराष्ट्राचा माणूस म्हणून आम्हाला अभिमान आहे. दौऱ्यातून त निष्पन्न काय होतं हे आम्ही बघणार आहोत असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.