‘भिडे हा जातीय द्वेष परविणारा साप’; विरोधीपक्ष नेत्याची जहरी टीका
तर त्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलने करण्यात आली. तर पावसाळी अधिवेशनात देखील यावरून सरकारला घेरण्याचे काम झाले. तर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह अटक व्हावी अशी मागणी लावून घरण्यात आली होती.
नागपूर, 01 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचे राज्यातभर संतप्त पडसाद उमटले होते. तर त्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार आंदोलने करण्यात आली. तर पावसाळी अधिवेशनात देखील यावरून सरकारला घेरण्याचे काम झाले. तर भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासह अटक व्हावी अशी मागणी लावून घरण्यात आली होती. त्यानंतर आता नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भिडे यांच्यावर जोरादार टीका केली आहे. यावेळी, भिडे गुजीला याला चोप दिला पाहिजे, कितीही शिक्षा झाली तरी चालेल. तर हा चंड माणूस असून तो जातीय द्वेष परविणारा साप आहे. भिडे याला नाग म्हणणं हा देखिल नागाचा अपमान असल्याची जहरी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
Published on: Aug 01, 2023 12:12 PM
Latest Videos