‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोप पाठवला असेल’; अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा या नेत्याची घणाघाती टीका
तर पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात शरद पवार यांना न भेटताच काढता पाय घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एकसंघ साठी अजित पवार आणि जेष्ठ नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रयत्न करत आहेत का असा सवाल आता उपस्थित होत आहे.
चंद्रपुर, 13 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून अजित पवार यांनी शरद पवार यांची तीन एक वेळा भेट घेतली होती. तर पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात शरद पवार यांना न भेटताच काढता पाय घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एकसंघ साठी अजित पवार आणि जेष्ठ नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रयत्न करत आहेत का असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण आता पुन्हा एकदा पुण्यात अजित पवार यांनी शरद पवारांची अतिशय गुप्त बैठक घेतल्याने राजकीय तापमान तापलं आहे. याच या भेटीवर काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, त्यांच्यातील गुप्त भेटीबाबत आताच निष्कर्ष काढणे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्याला काहीही करून भाजप समर्थनासाठी तयार करा, असा निरोप पाठवला असेल. तो देण्यासाठीच अजित पवार गेले असतील अशी खोचक टीका केली आहे. तर एकनाथ शिंदे अथवा अजितदादा पवार यांना सामील करून देखील भाजपची घसरण सुरूच असल्याने ही खेळी खेळली जात आहे. भाजपकडून जनाधार असलेल्या नेत्यांना चूचकारणे सुरू केलं आहे अशी देखील टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.