Vijay Wadettiwar : ‘विरोधात बोलतोय मला सुखानं झोप लागू देतील का?’, वडेट्टीवार यांचा कुणावर निशाना?

Vijay Wadettiwar : ‘विरोधात बोलतोय मला सुखानं झोप लागू देतील का?’, वडेट्टीवार यांचा कुणावर निशाना?

| Updated on: Aug 20, 2023 | 7:53 AM

गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी शिंदे गटासह भाजपला शिंगावर घेतलं आहे. त्यांनी सप्टेंबरपर्यंत खुर्ची बदलेल असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

चंद्रपूर : 20 ऑगस्ट 2023 | विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गेल्या काही दिवसापासून भाजप-शिंदे-पवार सरकारचा समाचार घेणं सुरू केलं आहे. त्याचदरम्यान त्यांनी थेट मुख्यमंत्री खुर्चीबाबतच वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडालेली आहे. वडेट्टीवार यांनी येत्या काही दिवसात या राज्यात मोठं राजकीय उलथापालथ होईल तर मुख्यमंत्री बदलला जाईल असे विधान केलं होतं. ज्यामुळे त्यांच्यावर आता भाजप आणि शिंदे गटासह अजित पवार गटाकडून टीका होत आहे. यावरून वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा असंच वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे उपस्थितांच्या भूवया उंचावल्या आहेत. यावेळी वडेट्टीवारांनी आपल्यावर कारवाईची ब्याद मागे लागेल अशी भीती वाटत आहे. आपण त्यांच्या विरोधात बोलतोय त्यामुळे मला ते सुखानं झोपू देतील का असे देखील त्यांनी म्हटलं आहे. आपण घाबरत नाही असा दमच भाजपला भरला आहे. तर भाजपवाल्यांचीही पापं आपल्याला माहीत असल्याचा दावा केला आहे. आमची सत्ता आल्यास भाजपच्या लोकांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा प्रहार त्यांनी केला. तर छगन भुजबळ यांच्यावरही निशाना साधत ते जिथे जाोऊन आलेत तिथे मी पण जाऊन आलोय असा टोला लगावला आहे.

Published on: Aug 20, 2023 07:44 AM