‘नाहीतर गेलेले बळ गेलेला भुजबळ असं होईल’; ‘त्या’ विधानावरून भुजबळ यांना काँग्रेस नेत्याचं समर्थन
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य करत नव्या वादाला तों फोडले आहे. यामुळे सध्या टीका होत असतानाच त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेत्यानं त्यांचं समर्थन केलं आहे.
नागपूर : 20 ऑगस्ट 2023 | ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी हे नाव ठेवत नाहीत असं वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. त्यामुळे सध्या राज्यात नव्या वादास तोंड फुटलेलं आहे. तर तर भुजबळ यांनी हे वक्तव्य एका कार्यक्रमात केलं होतं. तसेच त्यांनी आपण इकडे-तिकडे गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा घेऊ जाऊ, सोडणार नाही असे म्हटलं आहे. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. तर यावरून काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी समर्थन केलं आहे. तसेच भुजबळ बोलले ती वस्तुस्थिती आहे. भुजबळ सत्तेत राहून जर असं बोलत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. बहुजनाचे नेते म्हणून आम्ही त्यांना बघत होतो. ते जर या भाषणावर ठाम राहील शब्द फिरवणार नाही मागे घेणार नाही तर खरा भुजबळ नाहीतर गेलेले बळ गेलेला भुजबळ असं होईल अशी टीका केली आहे.