‘...तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा!’ शिवसेना नेत्यानं भाजपला डिवचलं

‘…तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा!’ शिवसेना नेत्यानं भाजपला डिवचलं

| Updated on: Jun 10, 2023 | 1:45 PM

औरंगजेबचे स्टेटस आणि पोस्टर लावण्यावरून वाद होताना दिसत आहेत. तर कोल्हापुरमध्ये दंगलसदृश स्थिती निर्माण झाली होती. यावरूनच विरोधकांनी भाजपसह शिंदे गटावर निशाना साधत टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपला डिवचले आहे.

औरंगाबाद : राज्यभरात सध्या औरंगजेबवरून जोरदार राजकारण सुरू आहे. तर औरंगजेबचे स्टेटस आणि पोस्टर लावण्यावरून वाद होताना दिसत आहेत. तर कोल्हापुरमध्ये दंगलसदृश स्थिती निर्माण झाली होती. यावरूनच विरोधकांनी भाजपसह शिंदे गटावर निशाना साधत टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपला डिवचले आहे. त्यांनी भाजपला खोचक टोला लगावताना एक ट्विट केलं आहे. ज्यात दानवे यांनी, ‘बाटलीतून भूत’ बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की पाकिस्तान. कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले. तेव्हा त्यावर काय कारवाई केली, की विसर पडला तुम्हाला याचा? अल्पवयीन मुले यात सापडत आहेत. ते स्वतःचा मेंदू वापरून हे कृत्य करणे शक्यच वाटत नाही. त्यांचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे? हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे. स्वतःला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा! असा टोला लगावला आहे.

Published on: Jun 10, 2023 01:45 PM