ज्यांना माझे काम बघवत नाही तेच...; अजित पवार यांचा हिंतचिंतकांना थेट इशारा

ज्यांना माझे काम बघवत नाही तेच…; अजित पवार यांचा हिंतचिंतकांना थेट इशारा

| Updated on: May 07, 2023 | 2:52 PM

तर अजित पवार यांच्यामुळेच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ते दिल्लीलाच गेले. असे अक ना अनेक चर्चा राज्याच्या राजकारण गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या बाबत सुरू आहेत.

बारामती : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज, ते भाजपमध्ये जाणार? शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू असतानाच अजित पवार मागच्या दारानं गेले. तर अजित पवार यांच्यामुळेच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. ते दिल्लीलाच गेले. असे अक ना अनेक चर्चा राज्याच्या राजकारण गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या बाबत सुरू आहेत. त्यावरून अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता अजित पवार यांनी सडकून टीका केलीच आहे त्याचबरोबर अनेकांना इशारा ही दिली आहे. तसंतर अजित पवार यांना शालूतून जोडे मारणं चांगलंच जमतं तेच त्यांनी आज केलं. बारामतीत पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना अजित पवार यांनी चांगलीच बँटींग केली. त्यांना तुमच्याचबद्दल लोक संभ्रम का पसरवत असे विचारलं असता त्यांनी थेट उत्तर देत अनेकांनी इशारा दिला आहे. तर पत्रकार मित्र प्रश्न विचारतात त्याच्यातून हा संभ्रम निर्माण होतो. तर ज्यांना माझे काम बघवत नाही, ते आवडत नाही. मी जे करतो त्याबद्दल त्यांच्या मनात काहितरी काहितरी असतं. जे आमचे हितचिंतक आहेत, आमच्यावर प्रेम करणारे आहेत. त्च माझ्याबद्दल असा संभ्रम निर्माण करतात. असं वातावरण तयार करतात असा टोला लगावला आहे.

Published on: May 07, 2023 02:52 PM