ठाण्यात राडा; पोळ यांना मारहाण; ‘200 जणांनी मारलं, आमचे 50 जर असते तर’, ठाकरे गटाच्या नेत्याची संतप्त प्रतिक्रिया
कळवा येथील मनीषा नगर जयभीम नगर येथे शिवसेना सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच हल्ला करण्यात आला. तर शाईफेक करत त्यांना मारहाण करण्यात आली. यावरून आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला. यावेळी कळवा येथील मनीषा नगर जयभीम नगर येथे शिवसेना सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच हल्ला करण्यात आला. तर शाईफेक करत त्यांना मारहाण करण्यात आली. यावरून आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. यामारहाणीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शिंदे गटावर हल्लाचढवताना शिंदे गटाला ना मर्द म्हटलं आहे. तसेच 200 जणांना अभिमन्यूला जसे घेरून मारले तसा प्रकार शिंदे गटातील लोकांनी केला. जर हिंमत असेल तर समोरा समोर या असं आव्हान देताना, एकटीला घेरून 200 जणांनी मारलं तिथे आमचे 50 जरी असते तरी पुरून उरले असते, असं अंबादास दानवे म्हणालेत. तर ती शिवसेनेची वाघीण आहे. ती आता आणखी त्वेशाणं लढेल असंही ते म्हणालेत.