‘त्यांची शेवटची टर्म, त्यांना पुन्हा विधानभवनात जायला पुन्हा संधी नाही’; शिंदे गटातील नेत्यांवर शिवसेना नेत्याची टीका
याबाबत त्यांनी पावसाळी अधिवेशानात प्रश्न लावून धरला तर त्यावरूनच त्यांनी आयुक्त इकबाल चहल यांना पत्र देखील लिहलं आहे. तसेच याची चौकशी होणार आहे का? असा सवाल केला आहे. तसेच याचे उत्तरे न मिळाल्या आपल्याला विधानसभेच्या विशेषाधिकाराचा वापर करावा, लागेल असा इशारा देखील दिला आहे.
मुंबई, 13 ऑगस्ट 2023 | मुंबई महापालिकेच्या स्ट्रीट फर्निचर कामाअंतर्गत झालेला घोटाळा (Street Furniture Scams) ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बाहेर काढला. याबाबत त्यांनी पावसाळी अधिवेशानात प्रश्न लावून धरला तर त्यावरूनच त्यांनी आयुक्त इकबाल चहल यांना पत्र देखील लिहलं आहे. तसेच याची चौकशी होणार आहे का? असा सवाल केला आहे. तसेच याचे उत्तरे न मिळाल्या आपल्याला विधानसभेच्या विशेषाधिकाराचा वापर करावा, लागेल असा इशारा देखील दिला आहे. यावरूनच शिंदे गटाकडून ठाकरे गटाला इशारा देताना, यावरून ठाकरे गटातीलच नेत्यांची चौकशी होईल अशी टीका केली होती. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा टीकेची झोड उडवली आहे. यावेळी त्या गटातले लोका निर्लज्य आहेत. आमच्या सोबत राहून त्यांनी मजा मस्ती केली. आम्ही रोखत होतो म्हणूनच ते तिकडे गेले. तर आताचे मंत्री झालेले त्यांची शेवटची ही टर्म आहे. त्यांना पुन्हा विधानसभेत जाण्यास वेळ मिळणार नाही. त्याचबरोबर अशा लोकांना देखील आम्ही परतीचे सर्व दारं बंद केलेली आहेत. या टीकेनंतर आता शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळत आता हे पाहावं लागेलं.