‘शिंदे गटाचा विश्वास दिल्लीतील महाशक्तीवर’ संजय राऊत यांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल
तर कोणत्या पद्धतीने पक्ष तोडला गेला? ते घटनेच्या कोणत्या नियमात बसतं? देशात इतर ही ठिकाणी हाच कित्ती गिरवण्यात आला आणि राज्यात सरकारं पाडण्यात आली. असंच सुरू राहिलं तर देशात घटनाच अस्तित्वात राहणार नाही.
नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करून पाडले. त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आणने. यानंतर उद्धव ठाकरे गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दारे ठोठावली. त्या सत्ता संघर्षावर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उद्या ही यावर सुनावणी होणार आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.
सत्ता संघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर सतत टीका होत असते. तसेच हे सरकार संविधानीक नसल्याचे संजय राऊत म्हणत असतात. आताही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना, हे टीकणार नाही, घटनाबाह्य सरकार सत्तेवर एक दिवसही राहता कामा नये, असा आदेशच कोर्टाने द्यायला हवा होता अशी आमची अपेक्षा होती, असं म्हटलं आहे.
तर कोणत्या पद्धतीने पक्ष तोडला गेला? ते घटनेच्या कोणत्या नियमात बसतं? देशात इतर ही ठिकाणी हाच कित्ती गिरवण्यात आला आणि राज्यात सरकारं पाडण्यात आली. असंच सुरू राहिलं तर देशात घटनाच अस्तित्वात राहणार नाही. न्यायालयाचं महत्त्व राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. ‘शिंदे गटाचा विश्वास दिल्लीतील महाशक्तीवर’ संजय राऊत यांचा महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.