Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप, नारायण राणे म्हणाले, ‘ताब्यात घ्या’
हे भयानक आहे. भयंकर आहे. त्यांना कुठून माहिती मिळाली हे माहित नाही. पण, जर ते खरे असेल तर पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे. याची दखल पोलीस खात्याने घेतली पाहिजे.
मुंबई : 14 सप्टेंबर 2023 | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मोठा आरोप केला होता. देशातील पाच मोठ्या हिंदू धार्मिक स्थळावर स्थळावर हल्ला होऊ शकतो. लोकसभेचे इलेक्शन जवळ आले आहे. भाजप आणि आरएसएसचे राजकारण लक्षात घेता हिंदूंची जिव्हाळ्याची अशी जी पाच मंदिरे आहेत. वाराणसी, अयोध्या, मन्गोलीय अशी मंदिरे कदाचित टार्गेट होऊ शकतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची अशी मागणी आहे की इलेक्शन होईपर्यंत ही मंदिरे लष्कराच्या ताब्यात देण्यात यावी असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांची आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोस्ती झाली आहे. त्यामुळे त्यांची विचारसरणी तिकडे चालली आहे. त्यांच्याकडे अशी माहिती कुठून आली ते माहित नाही. पण, हे आहे ते भयंकर आहे. भयानक आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे. भाजप हा राष्ट्राभिमानी असा पक्ष आहे. केंद्रात दहा वर्ष झाली सत्ता आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाची दखल पोलीस खात्याने घेतली पाहिजे, असे नारायण राणे म्हणाले.