Sanjay Rathod | विस्तारानंतर नाराज आमदार उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात?

Sanjay Rathod | विस्तारानंतर नाराज आमदार उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात?

| Updated on: Aug 11, 2022 | 11:37 AM

त्यानंतर शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर बंडखोर आमदारांसह समर्थकांच्या नजरा मंत्रिमंडळ रचनेकडे लागल्या होत्या.

शिंदे गटातील एकही आमदार नाराज नाही. शिंदे सांहेबांना आम्ही सर्व आधिकार दिले आहेत ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असतो. विस्तारानंतर नाराज आमदार उध्दवजी यांच्या सपर्कात आहेत, यावर आम्ही योग्यवेळी बोलू असं संजय राठोड यांनी सांगितलं. शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे गटात गेल्या महिन्यात सामील झालेले शिवसेना नेते आणि यवतमाळ जिल्ह्यातील आमदार संजय राठोड यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार समारंभात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. या वर्षाच्या सुरुवातीला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वादात अडकल्याने संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर बंडखोर आमदारांसह समर्थकांच्या नजरा मंत्रिमंडळ रचनेकडे लागल्या होत्या.

Published on: Aug 11, 2022 11:37 AM