पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, शिंदे की पवार? शंभूराज देसाई म्हणतात...

पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, शिंदे की पवार? शंभूराज देसाई म्हणतात…

| Updated on: Feb 12, 2024 | 11:46 AM

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी निर्धार केल्याची तुफान चर्चा सुरु आहे. या विषयी शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे

Shambhuraj Desai: सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार सुरु आहेत. अशातच आता अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निर्धार केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी निर्धार केल्याची तुफान चर्चा सुरु आहे. या विषयी शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की कोणी वक्तव्य करून आणि निर्धार करून कोणी मुख्यमंत्री होत नाही. ज्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे त्याच्या पाठीमागे 145 चं बहुमत असायला पाहिजे. आज महाराष्ट्रात महायुतीच सरकार आहे. यामध्ये शिवसेना, भाजप, अपक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे.

शंभूराज देसाई नेमकं काय म्हणाले?

महायुती सरकारचं हे 288 पैकी 200 पैक्षा जास्त आमदारांचं बहुमत मिळून महायुतीचं सरकार आलं पाहिजे. 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे 3 वरिष्ठ नेते एकत्र बसून महाराष्ट्राचा नेता ठरवतील. आम्हाला विचारालं तर आम्ही हेच सांगू की आम्हाला माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री म्हणून पाहिजेत. अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना विचारलं तर ते म्हणतील की अजित पवार हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत

Published on: Feb 12, 2024 11:35 AM