Amit Thackeray : नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून अमित ठाकरे पोहोचले थेट सिंधुदुर्गातल्या जंगलात…
अमित ठाकरे हे आपल्या विद्यार्थी संघटनेच्या कामासाठी इथे आले होते. पण त्यातील काही कार्यक्रम बाजूला ठेवत त्यांनी इथल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेतला.
सिंधुदुर्ग : मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनाही इथल्या निसर्ग सौंदर्याने भुरळ घातली. नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून ते थेट पोचले आंबोली चौकुळच्या जंगलात… चौकुळच्या जंगलात त्यांनी पायी विहार केला. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध यूट्यूबर रानमाणूसकार प्रसाद गावडे हे ही त्यांच्यासोबत होते. गावडे हे अमित ठाकरे यांना जंगलाविषयी, इथल्या नैसर्गिक साधनसंपत्ती विषयी माहिती देत देत हा प्रवास सुरू होता. यावेळी गावडे यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या रेनकोट (Raincoat) विषयी अर्थातच घोंगडीविषयी त्यांना माहिती दिली. अमित ठाकरे यांनी ही ती घोंगडी परिधान करून बघितली. तळकोकणातील दऱ्या खोऱ्यातून वाहणाऱ्या धबधब्याचे (Waterfalls) सर्वांनाच आकर्षण असते. अमित ठाकरे यांनी ही चौकुळमधल्या बाबा धबधब्याला भेट देऊन निसर्गाच्या मनोहारी अविष्काराची पाहणी केली. अमित ठाकरे हे आपल्या विद्यार्थी संघटनेच्या कामासाठी इथे आले होते. पण त्यातील काही कार्यक्रम बाजूला ठेवत त्यांनी इथल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेतला.