Maharashtra Politics : ‘महाराष्ट्रातलं सगळं राजकारण नासवलं’; कायदेतज्ज्ञाचा फडणवीस यांच्यावर घणाघात

Maharashtra Politics : ‘महाराष्ट्रातलं सगळं राजकारण नासवलं’; कायदेतज्ज्ञाचा फडणवीस यांच्यावर घणाघात

| Updated on: Jul 05, 2023 | 1:10 PM

राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी करण्यात आलेला प्रयत्न, त्यानंतर शिंदे सरकार करण्यासाठी फोडलेली शिवसेना अजूनही जनतेच्या लक्षात आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले तर सरकार पडले म्हणून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेला खेळ लोकांच्या पचनी पडताना दिसत नाही.

मुंबई : राज्यात सुरू असणाऱ्या राजकारणावरून सामान्य जनताच नाही तर आता कायदेतज्ज्ञ्यांनाही त्यांचा किळस येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी करण्यात आलेला प्रयत्न, त्यानंतर शिंदे सरकार करण्यासाठी फोडलेली शिवसेना अजूनही जनतेच्या लक्षात आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरले तर सरकार पडले म्हणून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेला खेळ लोकांच्या पचनी पडताना दिसत नाही. यावरून आता कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, सध्याचे राजकीय वातावरण हे संविधानिक दृष्टिकोनातून अत्यंत चुकीचं असल्याचे म्हटले आहे. तर फडणवीस यांची चाणक्य नीति ही देखील मतदारांच्या विरुद्ध असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर फडणवीस यांनी महाराष्ट्रातलं सगळं राजकारण नासवलं आहेच. तसेच ते एक अत्यंत विद्रुप राजकीय चेहरा म्हणून ते पुढे आले आहेत अशी बोचरी टीका केली आहे. तर शिंदे अपात्र झाल्यास हे सरकार पडू नये म्हणून अजित पवार यांना सत्तेत आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Published on: Jul 05, 2023 01:10 PM