11 तारखेनंतर राज्यात राजकीय भूकंप होणारच; शिवसेना नेत्यानं केला दावा; म्हणाला, ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात

11 तारखेनंतर राज्यात राजकीय भूकंप होणारच; शिवसेना नेत्यानं केला दावा; म्हणाला, ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात

| Updated on: May 04, 2023 | 3:12 PM

11, 12 तारखेपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल. तर हा निकाल आमच्याच बाजूने येणार. त्यामुळे यांच्याकडचे जे राहिलेले आमदार आहेत ते सगळे पळतील. एकही टिकणार नाही.

मुंबई : कायदे तज्ज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी 11 तारखेनंतर राज्यात सत्ता बदल होईल. नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी 10 मेच्या आधी नियुक्त्या नक्की होतील असं ट्विट केलं आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्यात राजकीय भूकंप होऊन त्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत हे संपतील अशी टीका केली आहे. तसेच त्यांनी राज्यात राजकीय भूकंप हा होणारच असं म्हटलं आहे. 11, 12 तारखेपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल. तर हा निकाल आमच्याच बाजूने येणार. त्यामुळे यांच्याकडचे जे राहिलेले आमदार आहेत ते सगळे पळतील. एकही टिकणार नाही. जे चार-पाच राहतील तेच एकमेकांमध्ये चर्चा करत राहतील असा घणाघात उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर केला आहे. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे पक्ष संपत असताना, उद्धव ठाकरे आजही संजय राऊत (Sanjay Raut) याचं ऐकत आहेत. तर उद्धव ठाकरे नाही कळत नाही की हा माणूस काय बोलतोय. तर नक्कीच भूकंप होईल आणि या भूकंपात हे सगळे भुईसपाट होतील.

Published on: May 04, 2023 03:12 PM