विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ जेव्हा पोहचतात टॅक्सीने अजित पवार यांच्या भेटीला…
राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे त्यांच्या साधेपणा आणि स्पष्टपणामुळे चर्चेत असतात. त्यांनी जापन दौरा केला मात्र त्यांनी तेथेही त्यांना साधेपणा सोडला नाही. त्यामुळे ते चर्चेत होते. तर आता ही अजित पवार यांच्या भेटूमुळे ते चर्चेत आले आहेत.
मुंबई :17 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूटफूट झाल्याने अजित पवार आणि शरद पवार गट बनले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज हे अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. यावेळी अजित पवार यांच्या गटात विधानसभा उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी देखील प्रवेश केला. त्यामुळे ते चर्चेत राहीले. याच्याआधी देखील जापान दौरा आणि १६ आमदार अपात्रतेवरून केलेल्या वक्तव्यावरून ते चर्चेत होते. आता देखील पुन्हा ते चर्चेत आले आहेत. यावेळी कोणत्या वक्तव्यामुळे नाही तर टॅक्सी प्रवासामुळे झिरवळ चर्चेत आले आहेत. झिरवळ हे काही कामानिमित्त सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेटीला टॅक्सीने गेले होते. मात्र अजित पवार यांची भेट न झाल्याने ते त्याच पुन्हा टॅक्सीने निघाले गेले. मात्र यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर विधानसभा उपाध्यक्षांनी सर्व सुविधा असताना चक्क टॅक्सीने प्रवास का केला असे सवाल आता केले जात आहेत.