सासुरवाडी, नागपुरनंतर आता लागले येथे अजित पवार यांचे 'भावी मुख्यमंत्री अजितदादाच! बॅनर्स

सासुरवाडी, नागपुरनंतर आता लागले येथे अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री अजितदादाच! बॅनर्स

| Updated on: Apr 27, 2023 | 1:29 PM

त्यांच्या सासुरवाडीत भावी मुख्यमंत्री असा बॅनर झळकल्यानतंर नागपूरात 'वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का' आशयाचा बॅनर लागला होता. यानंतर आता उल्हासनगरमध्ये 'जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादाच!', असे बॅनर्स लागले आहेत.

उल्हासनगर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार त्यांच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भातील वक्तव्यानंतर त्यांचे ठिकठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर झळकत आहेत. त्यांच्या सासुरवाडीत भावी मुख्यमंत्री असा बॅनर झळकल्यानतंर नागपूरात ‘वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का’ आशयाचा बॅनर लागला होता. यानंतर आता उल्हासनगरमध्ये ‘जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादाच!’, असे बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उत आला आहे. उल्हासनगरमधील हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रोहित गमलाडू, अमेय गमलाडू आणि अभिषेक दोंदे या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले असून आपण जनतेच्या मनातल्या भावना बॅनर्स स्वरूपातून मांडल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 

Published on: Apr 27, 2023 01:28 PM