कुठे कमी पडत असू तर जरूर काही बदल झाले पाहिजेत : नीलम गोऱ्हे
गोऱ्हे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी जात असतील तर काही बदल आवश्यक असतील तर ते झाले पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडली.
मुंबई : राज्यातील सत्तांतरणानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडली आणि थेट मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश आजही सुरूच आहे. शिंदेच्या पक्षात इनकमिंग सुरूच आहे. ज्यामुळे मुळ शिवसेना धक्का बसत आहे. यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे गटाला सोडणाऱ्यांची दिवसागणित संख्या वाढत आहे. त्यावर गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर यावेळी गोऱ्हे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी जात असतील तर काही बदल आवश्यक असतील तर ते झाले पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडली.
तसेच गोऱ्हे यांनी कमीत कमी लोक पक्ष सोडून जातील यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे. पण तरीही आम्ही कुठे कमी पडत असू तर याबाबत जरूर काही बदल झाले पाहिजेत असं मला वाटतं असं त्यांनी म्हटलं आहे.