ठाकरे गटाला धक्का देणाऱ्या मनिषा कायंदे यांच्यावर निलम गोऱ्हे स्पष्ट बोलल्या, ‘रस्त्यावर’
उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. गेल्या काही तासांपासून त्या नॉट रिचेबल होत्या. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. गेल्या काही तासांपासून त्या नॉट रिचेबल होत्या. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान शिवसेना वर्धापन दिनाच्या पुर्वसंधेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात आहे. तर मनिषा कायंदे यांच्यासोबत 2 माजी नगरसेवकदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तर यावरून विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. त्यांनी आपण एका संविधानिक पदावर असल्याने याचे उत्तर देणार नाही असं स्पष्ट सांगितलं. तसेच हा प्रश्न म्हणजे कोर्टात सुरू असणाऱ्या केसवर रस्त्यावर उभ राहून प्रश्न विचारण्यासारखं असल्याचंही त्या म्हणाल्या.