नीलम गोऱ्हे जयंत पाटील यांच्यावर भडकल्या अन् म्हणाल्या, तुम्हाला हे शोभत नाही तुम्ही…
विधानपरिषदेत आजचं कामकाज सुरू असताना नीलम गोऱ्हे या शेकापंच्या जयंत पाटील यांच्यावर भडकल्यात. नीलम गोऱ्हे म्हणाले, जयंतराव खाली बसा... माझं पूर्ण होऊ द्या...हे पहा जयंतराव...जयंत पाटील खाली बसा खुर्चीवर बसा...असा आक्रस्ताळेपणा बरा नव्हे...
नागपूर, १२ डिसेंबर २०२३ : सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक हे सत्ताधाऱ्यांना घेरत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे विधानपरिषदेत विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे या संतापल्याचे पाहायला मिळाले. विधानपरिषदेत आजचं कामकाज सुरू असताना नीलम गोऱ्हे या शेकापंच्या जयंत पाटील यांच्यावर भडकल्यात. नीलम गोऱ्हे म्हणाले, जयंतराव खाली बसा… माझं पूर्ण होऊ द्या…हे पहा जयंतराव…जयंत पाटील खाली बसा खुर्चीवर बसा…असा आक्रस्ताळेपणा बरा नव्हे… त्याची बातमी येईल, हे मी पण तुम्हाला उभं राहून सांगते तुम्ही जागेवर जाऊन बसा, तुम्हाला हे शोभत नाही, असे म्हणत नीलम गोऱ्हे भडकल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. तर हे वागणं बरं नाही. बाकी सगळे शिस्त पाळताय. फक्त तुम्हाला पाळायची नाही. तुम्ही माझा निर्णय ऐकून घेत नाहीत, तुम्ही शांत रहा, असे म्हणत जयंत पाटील यांना आवाहन केले.