अंबादास दानवे यांच्या आरोपाला शंभूराज देसाई याचं आव्हान; म्हणाले, ‘तर पुराव्यांसह…’
महसूल विभागातील 66 अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. या बदल्यांचे रात्री 4 वाजता आदेश निघाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या बदल्यांचे आदेश हे वेबसाईटवर न नमूद होता, त्या बदल्यांची माहिती ही व्हॉट्सअपला पाठविण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याने त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहीजे असं म्हणत त्यांनी आरोप केले होते.
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूल विभाग, कृषी विभाग, वन विभाग झालेल्या बदल्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. महसूल विभागातील 66 अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. या बदल्यांचे रात्री 4 वाजता आदेश निघाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या बदल्यांचे आदेश हे वेबसाईटवर न नमूद होता, त्या बदल्यांची माहिती ही व्हॉट्सअपला पाठविण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याने त्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहीजे असं म्हणत त्यांनी आरोप केले होते. त्यावर कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी दानवे यांनी फटकारलं आहे. तसेच दानवे हे एका महत्त्वाच्या पदावरती आहेत. ते संविधानिक पदावरती आहेत. जर माझ्या विभागात बदल्यांचा गैरकारभार झाला असेल तर त्यांनी पुराव्यांसहित हे उघडकीस आणावं. माझी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना करावी मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. तर त्यांच्याकडं कोणती माहिती असेल ती नगरविकास विभागास ती द्यावी. नसेल तर आता अधिवेशन होणारच आहे त्यात त्यांनी तो प्रश्न विचारावा आम्ही उत्तर देऊ. उगाचच हवेत तीर मारणं विरोधी पक्षाने बंद करावं असा टोला टगावला आहे.