मजबूत लोखंडी पिंजऱ्याचे गज वाकवले अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्याचे लोखंडी गड वाकवून या बिबट्याने धूम ठोकली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पुणे, ५ मार्च २०२४ : पुण्यातील कात्रज भागातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून एक बिबट्या पळाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्याचे लोखंडी गड वाकवून या बिबट्याने धूम ठोकली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पळालेल्या बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. हा बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून बिबट्या पळाला असल्याचे प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्याने एकच खळबळ उडालीय. दरम्यान, मजबूत पिंजऱ्यातून बिबट्यानं धूम ठोकल्यानंतर आता हा बिबट्या सापडेपर्यंत प्राणी संग्रहालय बंद राहणार आहे. बिबटया पळाल्याचे लक्षात येताच १३० एकर परिसरात, घनदाट जंगलात या बिबट्याला शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.